गुरु रविदास ६४३ जयंती जाति न पुछे साधुकी जात पात के फेर मंहि उरझि

गुरु रविदास ६४३ जयंती जाति न पुछे साधुकी जात पात के फेर मंहि उरझि रहयो सभ लोग! मानुषता कूखात हई, रविदास जात का रोग!! तथागत गुरु रोहिदासांच्या उद्दगारावरुन दिसून येते की, जातीच्या फेऱ्यात लोकांना अडकवण्यामुळे मानवतावाद नष्ट केल्याशिवाय मानवतावाद पुनः स्थापित होऊ शकत नाही. वैदिकांनी ७५०० जातींचा निर्मिती करुन राष्ट्र या बलशाली संकल्पनेचा जबरदस्त तडा देऊन मुळनिवासीचा अधोपती केला आहे आणि जात नावाच्या भयानक रोगाला समूळ नष्ट करण्यासाठी तथागत गुरू रविदासांनी इ.स. १३व्या शतकात आंदोलन चालविले. म्हणूनच तथागत गुरू रविदासांना अगस्तसंहिता या ग्रंथात यमाचा अवतार असल्याचे म्हटले आहे. वैदिक ब्राम्हण धर्मानुसार यम हा लोकांना मरण देणाऱ्यांचा मुखीया आहे. म्हणजेच तथागत गुरू रविदास मुत्यूचे प्रतिक होते असा सरळ सरळ अर्थ होतो. ___भारतामध्ये एकूण लोकसंख्येमध्ये २२ कोटी चर्मकार समाज असल्याने चर्मकार समाजाचे प.पुज्य संत शिरोमणी श्री रविदास यांची ६४३ वी जयंती भारतात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्या मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. समतावादी व सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे संत शिरोमणी श्री रविदास (रोहिदास) यांनी मानवतावादाचा शांततेचा महान संदेश दिल्यावर तसा विचार जगभरात झपाट्याने पसरला. ___ संत रविदास जयंती निमित्ताने संत रविदासांचा सार्वजनिक ठिकाणी सन्मान टिकवणं म्हणजेचं खरा आदर्श - १५ व्या शतकातील मानवता आणि विज्ञानवादाचे पुरस्कर्ते युगप्रवर्तक संत रविदास यांची प्रथम जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत रविदासांना प्रेरणा स्थानमानुन १५ फेब्रुवारी १९५३ साली ५५५ वी जयंती दिल्ली येथे साजरी केली. हा आदर्श घेऊन व त्यांचे विचार घेऊन आपणही जयंती उत्सव साजरा केला पाहिजे. संत रविदासांनी कधीचं एका विशिष्ट जाती तथा धर्मासाठी काम केले नाही तर समस्त लोककल्याण आणि परिवर्तनासाठी संघर्ष केला.यांची अनुभुती आपल्याला त्यांच्या अनेक दौहयातुन अनुभवण्यास मिळेल.आपण २०२० मध्ये पदार्पण केले आहे, तसे हे वर्ष अविस्मरणीय आणि अत्यंत वेगळे.या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व नेते आणि संघटनांना एक विनम्र विनंती आहे की,या वर्षी संत रविदासांची जयंती उत्सव सोहळा सार्वजनिक जयंती उत्सव साजरा करुन, आयोजका मध्ये आपआपल्या संघटनेचे नाव टाका. या निमित्ताने संत रविदासांचा तोचं सन्मान आणि उंची कायम ठेऊन संत कोणता लिखित पुरावा वाचण्याचा अधिकार आंबेडकर यांचा संदर्भ याबाबतीत महत्वाचा मानला जातो. बाकी कोणता लिखित पुरावा सापडत नाही. त्याकाळी कुणाला लिहिण्यावाचण्याचा अधिकार नव्हता त्यामुळे रविदासांची जन्म तारीख कुणी लिहून ठेवली नाही. पौर्णिमा हा शुभ दिवस समजला जातो. त्यामुळे बुद्धापासून असंख्य साधू, संत, गुरु, महापुरुष हे पौर्णिमेला जन्मले आणि पौर्णिमेलाच मरण पावले असे गृहित धरून जयंती व स्मृतिदिन एकाच दिवशी पौर्णिमेला साजरे करण्याची प्रथा रूढ झाली आहे. समाजाचे सशक्त संघटन झाले पाहिजे आणि गुरु रविदासांची समतावादी विचारधारा रुजविण्याचा संकल्प झाला पाहिजे अशी गुरु रविदास जयंती आपण साजरी केली पाहिजे!